तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत बाल आनंद मेळावा 5 मार्चला संपन्न झाला.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्वाती पवार, पूजा खंदारे,अश्विनी भक्ते, अब्बास शेख, नंदिनी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे,सहशिक्षक धनंजय थोडसरे, नवनाथ चंदनशिवे, अनिता पांढरे,एस .पी.राठोड यांनी परिश्रम घेतले.


 
Top