धाराशिव (प्रतिनिधी)- जलदिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग धाराशिव कार्यालयांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.एन. भोई अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ लातूर यांनी प्रथम जल पूजन केले. त्यावेळी उपस्थित असलेले अधिकारी, कर्मचारी समवेत जल प्रतिज्ञा शपथ घेण्यात आली. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जलजागृतीसाठी जलदिंडी काढण्यात आली.

जलदिंडीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील व ग्रामीण पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता सरवदे टी. एस., अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पाणी व स्वच्छता या विषयातील तज्ञ म्हणून श्रीमती पिंपळे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय व रमाकांत गायकवाड यांनी दैनंदिन जीवनातील पाणी वापरण्याची पद्धत व काटकसर व स्वच्छता या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्ष अभियंता यांच्या मान्यतेने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. सदर कार्यक्रमाची नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील सुशांत कुलकर्णी उपकार्यकारी अभियंता, वसंतराव पोद्दार शाखा अभियंता व हेमंत विधाते शाखा अभियंता यांचे सहकार्य लाभले.


 
Top