धाराशिव (प्रतिनिधी)-पुणे ते अमरावती दरम्यान नवीन साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे सदर रेल्वे गाडी क्रमांक 11405 ही गाडी पुणे ते अमरावती द्विसाप्ताहिक एक्सप्रेस दिनांक दहा मार्च 2024 पासून दर शुक्रवारी आणि दर सोमवारी पुण्याहून 22:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17:30 वाजता अमरावतीला पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 11 406 अमरावती पुणे द्विसाप्ताहिक एक्सप्रेस अमरावती येथून दिनांक 9 मार्च 2024 पासून दर शनिवारी आणि सोमवारी 19:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16:25 वाजता पुण्याला पोहोचणार आहे सदर रेल्वे गाडीचे थांबे उरळी,केडगाव, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्दुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजीनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली डेकन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा असा  आहे सदर गाडी सोडल्यामुळे मार्गावरील सर्व प्रवाशांची सोय होणार आहे. यातूनच शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यापार इत्यादी क्षेत्रातील प्रवाशांची वेळेची व पैशाची बचत होऊन प्रवास सुखकर व सुलभ होईल. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून सामान्य जनतेसाठी रेल्वेचा हा निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचे विशेष धन्यवाद आणि देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांनी आभार व्यक्त केले.


 
Top