तुळजापूर (प्रतिनिधी)- माझ्या भवानी मातेने संकट काळी महिषाशुर दैत्याचे मर्दन केले होते. ती जगदंबा आता या हुकमशहा दैत्याचे नक्की  मर्दन  करेल. असे स्पष्ट करुन ज्या शिवरायांनी सुरत लुटली त्याच शिवरायाचा महाराष्ट्र हे लुटत असल्याचा घणघणीत आरोप उध्दव ठाकरे यांनी तुळजापूर येथे झालेल्या जाहीर सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे  खा. संजय राउत, मिलींद  नार्वेकर, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, संपर्क प्रमुख नंदुराजे निंबाळकर, कमलाकर चव्हाण, अमीर शेख, महिला आघाडी प्रमुख शामल वडणे, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव, शहरप्रमुख सुधीर कदम, अमीर शेख सह पदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले कि, सेमी कंडक्टरचे आलेले दोन उद्योग यांनी गुजरातला नेले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणुकीत मताची भिक मागायला महाराष्ट्रात येतात. आणि मते दिल्यावर महाराष्ट्राला ओरबडून घेतले जाते. सर्व उद्योग गुजरात नेत आहेत. सध्या सोयाबीन, कापसाला वा  शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. पण गद्दारांना माञ भाव असल्याची  खोचक टिका शिंदे सेनेवर केली. यावेळी शिवसेना गटउपनेते सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातुन सताधारी वर चौफर टीका केली. या यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थितीत होते.


उध्दव ठाकरे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

शिवसेनाप्रमुख प्रमुख तथा माजी मुखमंञी उध्दव ठाकरे यांनी गुरुवार दि. 7 मार्च रोजी राञी आपली कुलदेवता असलेल्या  श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.  यथासांग कुलधर्म कुलाचार पुजा केली. या पुजेचे पौराहित्य ठाकरे घराण्याचे पारंपारिक पुजारी कुमार दिंगबर इंगळे यांनी केले. श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर श्रीतुळजाभवानी मातेचे महंत तुकोजीबुवा यांचे दर्शन घेवुन आशिर्वाद घेतला. यावेळी महंतांनी ठाकरे यांनी देविच्या कपाळाचा मळवट प्रसाद म्हणून दिला. 2019 नंतर उध्दव ठाकरे तुळजाभवानी दर्शनार्थ आले होते.



 
Top