तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरुळ येथील श्री कंचेश्वर यात्रा महोत्सव महाशिवराञी दिनापासून  शुक्रवार 8 मार्च  रोजी आरंभ होवुन रविवार दि. 10 मार्च 2024 या संपन्न होणार आहे.

महाशिवराञी  शुक्रवार दि. 8 पहाटे 5 वा श्री कंचेश्वरास विधीपूर्वक अभिषेक.  त्यानंतर विधीपूर्वक वाद्यवृंदाच्या निनादात श्री च्या काठीची स्थापना होईल.11 ते 03 उपवासाच्या पदार्थाचे अन्नदान होईल. राञी 9.वा   ह. भ. प. सोनाली दिदीजी महाजन आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. शनिवार दि. 9 मार्च रोजी दुपारी 4 ते 11 श्रींच्या पालखीची व काठीची भव्य दिव्य अशी मिरवणूक अश्वाच्या सह शोभेचे दारुकाम आणि आकर्षक अशा हलगीच्या निनादात होईल. व त्यानंतर श्री कंचेश्वाराची महाआरती होईल. रविवार दि. 10 मार्च रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

गावातील शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध कलागुणदर्शन असा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमास मंगरूळ व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कंचेश्वर महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती मौजे मंगरूळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी केले आहे.


 
Top