तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्रीराम मंदिरात श्री रामदास नवमी साजरी करण्यात आली.

श्री रामदास नवमी निमित्ताने मनाचे श्लोक व दासबोधाचे  सामुहिक पठण करण्यात आले.यावेळी मठाधिपती हभप अमोल महाराज रामदासी, बाळासाहेब आचार्य, बापू रामदासी,विलास व्यास, सतिष पाटील, विजयकुमार सराफ, दिलीप पाटील,राम कुलकर्णी, हेमंत व्यास, विजयकुमार बडवे, अनिल कुलकर्णी, सूर्यकांत व्यास, शशिकांत साहूत्रे, बाळासाहेब व्यास  व भक्तगण उपस्थित होते.


 
Top