धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षण प्रश्वावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सगेसोयऱ्यांना आरक्षणाची अधिसूचना न निघाल्याने राज्यभरातील मराठा समाजात महायुती सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात 1 हजार उमेदवार अर्ज भरणार असून, यातील चार ते पाच अंतिम करून यापैकी एकजणास निवडून आणण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता धाराशिव मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या स्पर्धेत उतरल्याचे चित्र आहे.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची बैठक पार पडली. बैठकीस शहर, जिल्ह्यातील मराठा समाजाचे पदाधिकारी व तरूण उपस्थित होते. बैठकीत 1 हजाराहून अधिक जण उमेदवारी अर्ज भरण्याबाबत, त्यासाठी लागणारी आर्थिक मदत व कायदेविषयक मार्गदर्शन याबाबत चर्चा झाली. समाजातील वकील मोफत सहकार्य करतील. 


 
Top