कळंब (प्रतिनिधी)- कळंब माजी सैनिक नागरी सरकारी पतसंस्थेची निवडणूक आज (दि. 4 मार्च) बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित चेअरमन  म्हणून श्री. सत्यनारायण कैलास पुरी व व्हाईस चेअरमन म्हणून श्री. रामजीवन पंढरीनाथ बोंदर यांची सर्व संचालकांनी सर्वानुमते बिनविरोध निवड केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्य लिपीक श्री. बालाजी चिंचोले यांनी काम पाहिले. 

माजी चेअरमन सोनाजी राजे यांनी सर्व नूतन संचालक व चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या. नूतन संचालक मंडळामध्ये अरुण आगवान, सोनाजी राजे, भागवत दौंड, बाळासाहेब व्हंडे, अनिल पवार, मधुकर कांबळे, रविंद्र जाधव, अंकुश तांबारे, शिवगंगा वरपे,  किरणमाला शेळवणे यांचा समावेश आहे. याप्रसंगी बोलताना नूतन चेअरमन सत्यनारायण पुरी व व्हा. चेअरमन रामजीवन बोंदर यांनी माजी सैनिक पतसंस्थेच्या नावलौकिक साजेल असे काम करुन दाखवण्याचा मनोदय व्यक्त केला.


 
Top