तुळजापूर (प्रतिनिधी)-नगरपरिषद नुतन मुख्याधिकारी श्रीमती प्रियवंदा म्हाडदाळकर  भा.प्र.से परिविक्षाधीन अधिकारी  यांनी तुळजापूर न.प. मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर  मंगळवार दि. 5 मार्च रोजी  विविध विभागाचा  कामाचा कर्मचारी यांच्या कडून माहिती घेवुन कामाचा आढावा घेतला.

श्रीमती प्रियंवदा म्हाडदाळकर यांनी सकाळी शाळा क्रमांक 2 येथे भेट देऊन तेथील विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.  त्यांना विविध प्रश्न विचारुन त्यांच्या बौद्धिक चाचपणी केली. शाळेच्या अनुषंगाने त्रुटी दूर केल्या जातील असेही यावेळी सांगितले. त्यांनतर त्यांनी नगर परिषद वसुलीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कँम्पला  भेट देऊन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी यांना आवश्यक सुचना दिल्या. आपण स्वतः वसुलीसाठी फिरणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक त्यांच्या सोबत उपस्थितीत होते.


 
Top