भूम/धाराशिव (प्रतिनिधी)- आयोध्येतील प्रभू श्री राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदार संघातून 1400 रामभक्त आयोध्देला मंगळवार दि. 5 मार्च रोजी सायंकाळी धाराशिव रेल्वे स्थानकावरून रवाना झाले. भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते. भूम तालुक्यातून तब्बल 120 राम भक्त रवाना झाले आहेत. हे सर्वजन भूम शहरातून प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत मार्गस्थ झाले आहे.

भूम शहरातील 30 राम भक्त व भूम तालुका ग्रामीण भागातील 90 राम भक्त मोठ्या आनंदी वातावरणात भूम शहरातील यश मंगल कार्यालयापासून गोलाई चौकापर्यंत अगदी प्रभू श्रीरामाचा जयजयकार करत चालत येऊन खाजगी वाहनाद्वारे धाराशिव रेल्वे स्थानकापर्यंत आले. धाराशिव येथून उपलब्ध केलेल्या आस्था रेल्वेच्या माध्यमातून सर्वजण रवाना झाले आहेत. 

या सर्वांना तालुका पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, शरद चोरमले यांच्यासह असंख्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे पाचशे साठ वर्षाच्या लढ्यानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी आता दर्शनासाठी खुले झाले आहे. त्या राम लल्लांचे दर्शन घेण्याचा योग धाराशिव लोकसभेतील 1400 राम भक्तांना आला आहे. 





 
Top