तुळजापूर (प्रतिनिधी)- परिक्षा, रबी  पिके काढणी मौसम, वाढते तापमान पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या संखेत मोठी घट झाली आहे.याचा परिणाम शहरातील बाजार पेठेत अर्थिक मंदी निर्माण झाली आहे.

बारावीच्या परिक्षा संपल्यावर आता दहावीचा परिक्षा सुरु झाले आहे. त्यामुळे  मुल पालके परिक्षा तयारीत दंग आहेत. तर रबीतील ज्वारी, गहु, हरभरा  काढणी मौसम जोरात सुरु आहे. तसेच वाढते तापमान त्यात आभाळ येत असल्याने तापमानात वाढ होवुन असाह्स उकाडा निर्माण होत आहे. याच्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

सध्या फक्त नवविवाहीत नवदांम्पत्य दर्शनार्थ येत आहेत. भाविकांची संख्या घटल्याने भाविकांनी भरभरून वाहणाऱ्या दर्शन मंडपातील धर्म, मुख दर्शन तसेच संभाजी प्रागणातुन मंदिरात येणारी अभिषेक व सशुल्क दर्शन रांग भाविका विना सुनसान पडल्या आहेत. ऐरव्ही दुपारी दर्शनार्थ दोन ते अडीच तास लागत होते. तिथे अर्धा ते भाविक वाढले तर एक तास लागत आहे. मुख व सशुल्क दर्शन लवकर होत आहे. सध्या दर्शनार्थ आलेला भाविक कमी वेळात सुलभ दर्शन देविचे घडत असल्याने भाविक समाधानी होत आहे. सध्या गर्दी दिनी म्हणजे शुक्रवार, रविवार, मंगळवार, पोर्णिमा दिनी मंदिर पहाटे एक वाजता दर्शनार्थ उघडले जात असल्याने असाह्य उष्णतेचा ञास नको म्हणून पहाटे भाविक लवकर कुलधर्म कुलाचार करून गावी जात आहेत.


 
Top