तुळजापूर (प्रतिनिधी) -  लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. संपूर्ण देशातील लोकसभेची निवडणूक ही यंदा सात टप्प्यात होणार आहे.  7 एप्रिल 2024  ला उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे मतदान आहे. यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने मे चे तापमान एप्रिल मध्ये निर्माण झाले आहे.  मे मध्ये तापमानात  प्रचंड वाढण्याच्या शक्यता आहे. या  पार्श्वभूमीवर असाह्य उष्णतेमुळे मतदानाचा टक्का वाढविणे प्रशासन व पक्ष उमेदवारांसमोर आवाहन असणार आहे.

मागील लोकसभा निवडणूक 2019 मध्ये हीच निवडणूक महाराष्ट्रात चार टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल ते 29 एप्रिलदरम्यान झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या

मतदानाचा निकाल त्यावेळी 23 मे रोजी लागला होता. यंदा तोच निकाल मतमोजणी  4 जून रोजी लागणार आहे. एकंदरीत एप्रिल-मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये निवडणुका होत आहेत. वाढता उकाडा व मतदान प्रक्रिया काळात  सलग आलेल्या सुट्ट्या या सगळ्याचा परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्या 19 एप्रिल, दुसरा 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले. मे महिन्यात सर्वाधिक उकाडा असतो. त्यामुळे या सर्वांचा परिणाम मतदानावर होऊन मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मतदान दि. 7 मे रोजी रविवारी असल्याने शनिवार, रविवार नंतर मंगळवार 9 मे ला गुढीपाडवा आल्याने शनिवार, रविवार, मंगळवार  अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने मतदार फिरायला जाण्याची शक्यता असल्याने याचा परिणाम मतदारांच्या टक्यावर होण्याची शक्यता आहे. या कालावधीत  शाळेला सुट्टी आणि कडक उन्हाळ्यामुळे आपल्या मूळ गावी किंवा बाहेरगावी फिरण्यास जात असतो. निवडणूक आयोग आणि राजकीय नेत्यांनी कितीही आवाहन केले तरी याबाबत मतदारांना त्याचे काही सोयरसुतक नसल्याने तो मतदानासाठी थांबत नाही. हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी टक्केवारी घसरण्याची मोठी शक्यता आहे.

यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर आणने हे प्रशासन व पक्षाला आवाहन असणार आहे. जर टक्केवारी घसरली तर माञ याचा फटका कुण्या पक्षाला मतदारांना  बसणार हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.


 
Top