तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर  तालुका काँग्रेस पक्षाचे  तालुकाध्यक्ष पद मागील चार महिन्या पासुन रिक्त असल्याने सदरील या रिक्त जागे बाबतीत अनेक चर्चेला उधाण आले आहे.  तालुकाध्यक्ष पद तात्काळ भरुन या चर्चला पुर्ण विराम देण्याची मागणी   सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यां मधुन केली जात.

तुळजापूर तालुका एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. माञ मागील विधानसभा निवडणुकीत तो ढासळला. त्या नंतर काँग्रेस पक्षात मरगळ आली.

सध्या जिल्हयात काँग्रेस नेते बसवराज पाटील भाजपवासी झाल्याने तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षातील नेत्यां बाबतीत खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यात संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नगरसेवक अमर मगर यांनी आपला कार्यकाल पुर्ण होताच त्यांनी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. चार महिने होवुन ही हे तालुकाध्यक्ष पद भरले नाही. त्यातच लोकसभा निवडणूक आचारसंहिता शनिवारी लागली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला  तालुकाध्यक्षच नसल्याने काँग्रेस  कार्यकर्त्यांना  महाविकास आघाडी चा उमेदवार प्रचार कसा करावा असा प्रश्न पडला आहे. सध्या निवडणुक मोसम असताना काँग्रेस पक्षातील शांततेच्या वातावरणा बाबतीत बरेच काही सांगुन जाते आहे. तरी तात्काळ  रिक्त  काँग्रेस तालुकाध्यक्ष पद भरण्याची  मागणी एकनिष्ट काँग्रेस कार्यकर्त्यामधुन केली जात आहे. 
Top