धाराशिव (प्रतिनिधी) -धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांची प्रलंबित असणारी 373 देयके तात्कळ मंजूर करावीत यासाठी मा. जिल्हाधिकारी मा. डॉ. सचिन ओंबासे व जिल्हा कोषागार अधिकारी सचिन सालकर यांना आज प्रत्यक्ष भेटून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

चार कोटी बत्तीस लाख रुपयाची प्रलंबित असणारी वैद्यकीय बिले दाखल करण्यास उशीर झाला हे कारण सांगून कोषागार कार्यालया कडून अनेक वेळा देयके परत पाठवण्यात येत होती. जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रलंबित देयके मंजूर करण्या विषयी तात्काळ प्रतिसाद देऊन जिल्हा परिषदेकडून आजच अखिल शिक्षक संघाच्या शिष्ट मंडळासमोरच 373 शिक्षकांची सुमारे चार कोटी बत्तीस लाखाची प्रलंबित असणारी वैद्यकीय देयके जिल्हा परिषदे कडून मागवून घेतली आसून सदर देयके मंजूर करून बिलाची रक्कम लवकरच शिक्षकांच्या खात्यावर  जमा होणार आहे.

जिल्हा कोषागार अधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य नेते बशीरभाई तांबोळी, राज्य महिला प्रतिनिधी सविताताई पांढरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, शाहू सोसायटीचे चेअरमन सुरेश भालेराव, दिव्यांग विभाग जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोहिते, कार्यालयीन चिटणीस महबूब काझी,  नगर परिषद विभाग जिल्हा प्रमुख राजेंद्र पवार, अल्पसंख्याक शिक्षक सोसायटीचे व्हाईस चेअरमन  मालोजी वाघमारे, शिवाजी साखरे, राजाभाऊ आकोसकर, सोमनाथ केवटे यांचा सामावेश होता.


 
Top