धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर येथे एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी हिताची कॅशी मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर या कंपनीच्यावतीने चालक सचिन विलास पारसे यासह इतर काहीजण गेले होते. यावेळी चालक सचिन पारसे याने गाडीत हवा कमी आहे म्हणून कॅशसह पळून गेला होतो. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपास करत तांत्रिक विश्लेषनाच्या अधारे कर्नाटक राज्यातील गुंडील पेठ जि. चामराजनगर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिस विभागाच्या या कामगिरीचे पैशासह आरोपींना ताब्यात घेतल्याने कौतुक होत आहे. यावेळी आरोपींकडून पोलिसांनी 85 लाखापैकी 84 लाख 86 हजार 500 रूपये जप्त केले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनीच्यावतीने एटीएम मशीन कॅश भरण्यासाठी सचिन विलास पारसे चालक हा व कंपनीचे काही लोक महिंद्र बोलेरो गाडीसह गेले होते. तुळजापूर मधील नळदुर्ग रोडवरील एचडीएफसी बँक येथील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर हवा कमी असल्याचे कारण असून, चालक सचिन पारसे व एक अनोळखी इसम हवा भरून येतो म्हणून कॅशच्या पेटीसह गेले होते. बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर परत न आल्यामुळे चालक सचिन पारसे यासह अज्ञात इसमावर 85 लाख रूपये चोरून नेल्याच्या तक्रारीनंतर तुळजापूर पोलिस ठाण्यात 23 मार्च रोजी गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तुळजापूर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, रविंद्र खांडेकर, सहायक पोलिस निरीक्षक खडके, कासार, भालेराव, चासकर, शैलेश पवार आणि स्थानिक गुन्हा शाखा व तुळजापूर पोलिस स्टेशनचे विविध पथके तयार करून आरोपीच्या शोधात रवाना केले होते. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना मिळालेल्या गुपनिय माहिती व तांत्रिक विशलेषणच्या आधारे आरोपी रवी किसन नामदास रा. सोलापूर यास गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकल सह व 20 लाख 50 हजार रूपये रोख रक्कमेसह ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन पारसे व महेश वर्तक हे कर्नाटकमधील गुंडिलपेठ जि. चामराजनगर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने 4 लाख 81 हजार 500 रूपयासह या दोन आरोपींना अटक केली. त्यांनतर आरोपींची कसून विचारपूस केल्यानंतर या गुन्ह्यातील 59 लाख 50 हजार रूपये जप्त करण्यात आले. आरोपींने वापरलेल्या गाडी भाड्यासाठी दिलेले 5 हजार रूपये ही पोलिसांनी जप्त केले. या गुन्ह्यातील रोख रक्कम 84 हजार 86 हजार 500 रूपये जप्त केल्यामुळे पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. धाराशिव पोलिस पथकास कर्नाटकमधील गुंडिलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशिव मुर्ती व पोलिस उपनिरीक्षक गौडा यांनी विशेष मदत केली. 


 
Top