धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची नुकतीच धाराशिव येथील पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा नेते संजय निंबाळकर आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या चिन्हाचे अनावरण करण्यात करण्यात आले. यावेळी तुतारी, शंख, हालगी, संभळाच्या निनाद करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यामध्ये ओबीसी जिल्हाध्यक्षपदी बालाजी डोंगे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल माने, जिल्हा उपाध्यक्षपदी भालचंद्र बिराजदार, जिल्हा चिटणीसपदी बाळासाहेब कथले व मुस्ताक हुसैनी यांच्या निवडी करण्यात आल्या.

तर जिल्हा सदस्यपदी मनोहर हारकर, लोहारा शहराध्यक्षपदी नानासाहेब पाटील, तुळजापूर विधानसभा अध्यक्षपदी शिवाजी सावंत यांची नियुक्ती करुन सत्कार करण्यात आला. यावेळी भास्कर शिंदे, नरदेव कदम, सुरेश टेकाळे, नशीरशहा बर्फीवाले, मुसद्दीक काझी, रमेश देशमुख, श्रीहरी नाईकवाडी, ॲड. प्रविण शिंदे, ॲड. श्रीपाद तावरे, शामसुंदर पाटील, नानासाहेब जमदाडे, सिंकदर बेगडे, सतीश माळी, डॉ. ताडेकर, बाळासाहेब कणसे, नवनाथ क्षिरसागर, गणपत चव्हाण, पंकज भोसले, नारायण चोंदे, अमर चोपदार, औदुंबर धोगडे, शरद जगदाळे, अक्षय परमेश्वर कदम, यश सुराणा, भाउसाहेब शिंदे, भारत शिंदे, सागर चिंचकर, विलास जगताप, किशोर आवाड, राजेंद्र लोमटे, अरुण जाधव, दिलीप लांडगे, महेश पडवळ, मिलींद नागवंशी,ज्योतीताई माळाळे, अनंत वरपे, नामेदव चव्हाण, रुबाब पठाण, अहमद शेख, किसन पांडगळे, गणेश खराडे, राजकुमार राठोड, बंडू शेळके, परमेश्वर येवले, अरिफ मुजावर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
Top