धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे  यांच्या  हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव शहर कार्याध्यक्षपदी मनोज भिमराव मुदगल यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मनोज मुदगल यांनी या अगोदर शहर उपाध्यक्षपदी काम केले आहे. त्यांच्या या कामाचा अनुभव पक्षाला नक्की होईल व पक्ष वाढीसाठी आपण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करेन.

आपण धाराशिव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर पातळीवरील संघटनात्मक बांधणी करून आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशावेळी पक्ष कार्यालयात धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,धाराशिव शहर सचिव सुजित बारकुल, केशेगाव जि.प गटप्रमुख लिंबराज लोखंडे, मनोज सुरवसे, चंदन नागरगोजे, अजिंक्य मुदगल, प्रमोद मुदगल, गणेश मुदगल, आदित्य गपाट, राजाभाऊ थोरात, दयानंद काठवळे प्रमोद कपाट व इतर बोंबले हनुमान परिसरातील सहकारी  सहकारी उपस्थित होते.


 
Top