भूम (प्रतिनिधी)-मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात रविंद्र हायस्कूलने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळून पाच लाख रुपयाचे बक्षीस मिळवल्या बद्दल आरोग्य दूत डॉ.राहूल घुले यांच्या वतीने प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कमल भीमराव घुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित, आरोग्य दूत डॉ.राहुल घुले (प्रशालेचे माजी विद्यार्थी) मित्र मंडळ यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात रविंद्र हायस्कूलने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून पाच लाख रुपयांचे बक्षीस मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच भागवत लोकरे, धनंजय पवार यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला नितीन गुंजाळ, हरीश गाढवे, शाम पालखे तसेच रविंद्र हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.