धाराशिव (प्रतिनिधी)-गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार आयोजित भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षामध्ये तेरणा साखर कारखाना प्रशालेतील चार विद्यार्थीनीना मेडल देऊन गौरविण्यात आले आहे. 

या परीक्षेला 150 विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे आज प्रशालेत अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल प्रशासक विजय घोणसे पाटील, मुख्याध्यापक  संजय पाटील, पर्यवेक्षक हनुमंत कोळपे या परीक्षेचे समन्वयक यु. बी. चव्हाण, दळवे, श्रीमती कांबळे,  श्रीमती परिहार मॅडम, कोरे, गाठे यांनी सहकार्य केले. याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, पालक, शिक्षक संघ पदाधिकारी, पत्रकार व पालक यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक केले. भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा  2023-2024 प्रशालेतील यशवंत विद्यार्थी. जिकरा गुलामरसूल शेख-6वी., श्रेया महेश कावळे -6वी., गौरी पुरूषोत्तम बाहेती  -7वी., अनुष्का अंकुश जाधव-7 वी.


 
Top