धाराशिव (प्रतिनिधी)- चित्रालय, माऊली नगर येथे धाराशिव जिल्हा संस्कार भारती समितीच्या आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव शासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव 2024 तील जिल्हा संस्कार भारतीच्या कलासाधकांना प्रमाणपत्राचे वितरण बैठकीची सुरुवात ध्येयगीतानी झाली. त्यानंतर पुढील वर्षभराच्या अनिवार्य कार्यक्रमाचे नियोजन, सभासद अभियान, जिल्हा कार्यकारिणी निवडी बद्दल अश्या विविध गोष्टीवर साधकबाधक एता सांग चर्चा झाली. गेली 25 वर्ष देवगिरी प्रांत लोककला विधा प्रमुख डॉ. सतिश महामुनी यांच्या मार्ग दर्शनात समितीने आजवर नागपूर, कुलुमनाली, वैष्णवीदेवी, इंदोर, ग्वालेयर, डोंबवली, अश्या अनेक ठिकाणी आई तुळजाभवानीचा गोंधळाचे नृत्याचे सादरणीकरण करण्यात आले. या धरतीवर आपल्या जिल्हातसुद्धा सादरणीकरण व्हावे असे महासंस्कृती समिती सदस्य युवराज नळे यांच्या माध्यामातून तब्बल 45 जिल्हा संस्कार भारतीच्या कला साधकांनी गोंधळनृत्य, महाराष्ट्रगीतानी महासंस्कृती महोत्सवाची दिमाखात सुरुवात केली. 

त्यात सहभागी कलासाधकाचे देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख तथा जिल्हामार्गदर्शक शेषनाथ वाघ, जिल्हाकार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर मोकाशी, कोष प्रमुख अविनाश धट, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळी कर यांचे हस्ते अरविंद पाटील, शरद वडगाकर, प्रफुल्लकुमार शेटे, धनंजय कुलकर्णी, संदीप रोकडे, सुरेश वाघमारे सुंभेकर, दिलीप महामुनी, लक्ष्मीकांत सुलाखे, लक्ष्मण वाघमारे, अजय राखेलकर, रवींद्र कुलकर्णी यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या बैठकीस महादेव केसकर आदि सदस्य उपस्थित होते प्रसायदानाने बैठकीची सांगता झाली. सुत्रसंचालन जिल्हा भुअंतकरण विधाप्रमुख लक्ष्मीकांत सुलाखे यांनी केले. तर आभार पद्माकर मोकाशी यांनी मानले.


 
Top