धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने विविध बँका आणि कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे.

यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार मुलाखत देऊ शकतो. या परिसर मुलाखतीमध्ये 15 बँका आणि काही कंपन्यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी मुलाखत देण्यासाठी मूळ कागदपत्रासह महाविद्यालयात सकाळी 10:00 वाजता हजर राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.


 
Top