भूम (प्रतिनिधी)-उमेदवार कोणही असो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचा असा निर्धार भूम परंडा वाशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केला.

 परंडा-भुम-वाशी मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक येथील भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी या कारखाना स्थळी पार पडली. या बैठकीमध्ये पक्षाकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तायारीला लागा असे अहवान सावंत यांनी केले . 

धाराशिव लोकसभेच्या जागेवरून  मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याचे  पडसाद ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. परिणामी विविध पक्षाकडून बैठकीचा जोर वाढला आहे. याच अनुषंगाने येथील भैरवनाथशुगर वर्क सोनारी कारखान्यावर   निवडणुकीच्या पुर्व तयारीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संभव्य उमेदवार धनंजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली.

 यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब हाडोग्रीकर, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,  पाटील,  माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, माजी सभापती दत्ता मोहिते, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आर्चना दराडे,  शिवाजीराव भोईट,  शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये बुथ कमिटीच्या सदस्यांना महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या. परंडा-भूम-वाशी मतदार संघातील सोशल मीडियावर ॲक्टिव्हपणे काम करणाऱ्या सदस्यांशी धनंजय सावंत यांनी थेट संवाद साधला. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सोशल मीडियावर प्रभावितपणे काम करण्याच्या सूचना सावंत यांनी सोशल मीडियाच्या सदस्यांना दिल्या.  बैठकीला भूम परंडा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top