धाराशिव (प्रतिनिधी)-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजकीय सूडबुद्धीने अटक केल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि.22) धाराशिव येथील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. ना झुकेंगे ना रुकेंगे,लडेंगे औंर जितेंगे.. अशा घोषणा देऊन भारतीय जनता पार्टी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा निषेध करण्यात आला. आम आदमी पार्टीच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीत पराभव समोर दिसून येत असल्यामुळे राजकीय सूडबुद्धीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. म्हणून मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या दडपशाही धोरणाचा निषेध इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात येत असल्याचे आम आदमी पार्टीचे राहुल माकोडे यावेळी म्हणाले. 

यावेळी शिवसनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे आदींनी भारतीय जनता पार्टीच्या दडपशाहीच्या धोरणावर कडाडून टीका केली. या आंदोलनात मुन्ना शेख, प्रशांत पाटील, तानाजी पिंपळे, राजपाल देशमुख, संजय दणाने, श्रीकांत भुतेकर, मुख्तार शेख, शहाजी पवार, अंकुश चौधरी, बिलाल रझवी, अभिजीत देवकुळे, मधुकर शेळके, सुरेश शेळके, उस्मानभाई तांबोळी, सागर साळूंके, दत्ता दळवी, सुरेखाताई यादव, बोबडे,  सुनील बडूरकर, बंडू आदरकर, संजय पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top