धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तुळजापुर-सोलापुर रेल्वे  प्रकल्पा अंतर्गत मार्गातील भुसंपादनाचे चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच चुकीच्या पध्दतीने केलेले निवाडयाची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडा करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. यावर मंत्रीमहोदय त्यावर विभागीय आयुक्त यांना अहवाल देण्याचे लेखी आदेश दिले आहेत. 

धाराशिव-तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पासाठी बांधीत शेतकऱ्यांच्या (धाराशिव व तुळजापुर तालुक्यातील) गावाचे निवाडे जाहिर करण्यात आले आहेत. त्यात गावातील 2018 ते 2021 मधिल जमिन खरेदी विक्री व्यवहार ग्रहित धरताना फक्त उच्चतम रकमेचे व्यवहार हे अवाजवी दर व 40 गुंठयापेक्ष कमी या कारणामुळे  वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेले व्यवहार हे भुसंपादन अणि पुनर्वसन कायद्यामधील नियमांच्या  तरतुदीचे उल्लंघन ठरत आहे.जमिनीचे सरासरी मुल्यांकन फारच कमी झाले असुन एकुण द्यायचा मावेजा जमिनीच्या चालु बाजार भावापेक्षा कितीतरी कमी झाला आहे. जाहीर केलेले अंतिम निवाडे यांच्यातील मोबदला व प्रारुप निवाडे यामध्ये बराच मोठी तफावत असुन परिणामी शेतकऱ्यांना मोबदला खुपच कमी मिळत आहे. या निवाडयामध्ये बागायत जमिनीस जिरायती जमिनीचे दर दिलेआहेत. जमिनीतील पाईपलाईन, विहिर, विंधन विहीर, फळबाग, पत्रा शेड यांचेही मुल्यांकन कमी केलेले आहे. या अन्यायकारक व बेकायदेशिर निवाडयाची चौकशी करावी, निवाडयामध्ये करण्यात आलेल्या गंभीर चुकांची दुरुस्ती करुन सुधारीत निवाडे करावेत अशी मागणी केली आहे. तसेच अशी बेकायदेशीर व चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन होण्याची अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. यापुढेही जिल्ह्यातुन मोठे प्रकल्प तसेच मार्ग जाणार आहेत. त्यांच्यावर आताच कारवाईचा बडगा उगारला तर भविष्यात या यंत्रणेकडून अशी बेकायदेशीर प्रक्रीया होणार नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी महसुलमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.


 
Top