तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासाठी वैशिष्ट्ये पुर्ण योजनेतंर्गत  8.50 कोटी निधी मंजुर करण्यात आला आहे. यामुळे जिजाऊ उद्यान अहिल्यादेवी   स्मृती उद्यान, अभ्यासिका, सरेख स्मृती रेस्ट हाऊस बांधकाम आठवडी बाजार व महिलांसाठी जिम मार्गी लागणार मार्गी लागणार आहे.

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तुळजापूर शहराच्या सर्वांगीन विकासासाठी शहरातील खालील महत्वाच्या कामांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.  त्या मध्ये प्रामुख्याने पुढील प्रमाने कामे घेण्यात आलेली आहेत. प्रभाग क्र 10 येथे महीलांकरीता व्यायाम शाळा बांधणे 50 लक्ष. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती उधान विकसित करणे 100. प्रभाग क्र येथल लाटे प्लाँटींग खुल्या जागेत महीला करिता व्यायाम शाळा बांधणे 50 लक्ष. प्रभाग क्र 10 येथे पापनास मंदीर येथील जवळील इमारती मध्ये ,  विद्यार्थी करिता अभ्यासिका विकसीत करणे. 50 लक्ष. प्रभाग क्र सर्वे नं 89 पै येथील खुल्या जागेत शहरातील मुला मुलींसाठी टेरीफ ग्राऊंड तयार करणे 118 लक्ष. प्रभाग क्र 3 जिजामाता नगर येथील अंतर्गतक्राँक्रीट नाली बांधकाम करणे (हाडको मैदान जवळ जिजामाता नगर खुली जागा) 22.50 लक्ष. प्रभाग क्र 3जिजामाता नगर येथील अतर्गत रस्ते विकसित करणे ( डाके सलीन ते चंद कुंड ) 33 लक्ष. प्रभाग क्र 3 अंतर्गत लादीकरण करणे ( कवडे घर ते मोगरकर घर) 15.47 लक्ष. प्रभाग क्र 3 येथील अंतर्गत लादीकरण करणे ( घोगरे हाटेल ते चोपदार घर ) 42.66 लक्ष.  प्रभाग क्र 3 येथील अंतर्गत लादीकरण करणे ( शुक्रवार पेठ पाणी टाकी बाग ) 17.74 लक्ष. जिजाऊ स्मृती उधान विकसित करणे. 50 लक्ष. शहरातील आठवडी बाजार व संकुल बांधकाम करणे. 299.73 लक्ष. एकुण रक्कम रु 849.10 येवढा तुळजापूर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केल्या बद्दल आमराद राणाजगजितसिंह पाटील यांचे विषेश आभार तुळजापूर शहरवासीय व्यक्त करत आहेत. सदरल निधी बाबतची माहीती युवा ऩेते विनोद  गंगणे,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिलेली आहे.


उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध - आ.पाटील

केंद्रिय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या संकल्पनेनुसार तुळजापूर शहर वैश्विक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आपले नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला असून तुळजापूर शहराचा कायापालट झालेला दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार.


 
Top