धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या संस्थापक सदस्य श्री माणिक हिरालाल देशमाने व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मीना यांना धाराशिव शहर सोडून जात असल्याबद्दल वयाचे 76 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सवी या वर्षाच्या निमित्ताने या दोघांचा सन्मान व सत्कार मंडळाच्या वतीने आज रोजी करून त्यांना निरोप देण्यात आला. 

मंडळाच्या या रंगमंचकावर श्री च्या व श्री तुळजाभवानीमाते च्या साक्षीने देशमाने दाम्पत्यास निरोप  दिला. मुला-मुलीना  नोकरीच्या निमित्ताने सतत बाहेरगावी राहण्यामुळे आई-वडिलांची सेवा घडू शकत नाही. संबंधित इथून पूर्ण आयुष्य हे आमच्या सहवासात आमच्याजवळ राहून घालवावे.  प्रॉपर्टी व जायदाद इकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रकृती व औषध उपचारासाठी  त्वरित सोय व्हावी. म्हणून धाराशिव हे शहर सोडून जाते वेळेस या दोघांनाही अश्रू आवरणे कठीण झाले.या दोघांचाही जन्म धाराशिव नगरीत गवळी गल्ली मध्ये झाले असल्याकारणाने बालपण ते आजतागायत खेळीमेळीत,मैत्रीपूर्ण नात्यात गुंतलेले जीवन सोडून जाता नां गहिवरून  आले. श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या स्थापनेमध्ये तत्कालीन मित्रपरिवार बंडू गवळी, मनमत पाळणे , विजय कुमार दिवटे, सोपान वैद्य, मोहन परमार, उत्तम राऊत ,दगडू राऊत, उमाकांत पाळणे, बबन शेळके, मोहनसिंग चव्हाणपरदेशी, रमाकांत कठारे 1964 साली स्थापन करून , आजतागायत पर्यंत मंडळाचे कार्य सामाजिक, धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक, क्रीडा क्षेत्रात अत्यंत सेवावृत्तीने कार्य करणारे व्हॉलीबॉल खेळ व  मंडळ राज्य पातळीवरील ते जिल्हा पातळीवरील अनेक पारितोषिके  सन्मान व गौरव मिळवून  देण्यात व विविध प्रकारचे शासकीय ,निमशासकीय गौरव चिन्ह देऊन गौरविलेले मंडळ निर्माण केले आहे .माणिक देशमाने हे एक चिवट व रात्रंदिवस कष्ट करून व स्वखर्चातून मंडळास रंग रूपास आणण्यात सिंहाचा वाटा आहे . देशमाने हे जिल्हा परिषद मध्ये एक कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आदर्श कर्मचारी म्हणून गणले गेलेले आहे .दोन मुले व एक मुलगी अत्यंत उच्चशिक्षित असून मुंबई ,औरंगाबाद, व परदेशात सातत्याने जावे लागत असल्याकारणाने आई-वडिलांना धाराशिवातून कायमचे मुंबई येथील वास्तव्यामध्ये घेऊन जाणारे व आई-वडिलांची सेवा ही आपल्या हातून घडावी या भावनेपोटी देशमाने कुटुंब दांपत्य  यांनी धाराशिव हे शहराला निरोप देताना अश्रू आवरता आले नाही. या दांपत्याचा सन्मान व सत्कार मंडळाच्या वतीने प्राध्यापक गजानन गवळी, काशिनाथ दिवटे, नंदकुमार हुच्चे,संजय पाळणे,सौभाग्यवती अलका गवळी, सुरेखा हुुच्चे, पुष्पा हुच्चे, निर्मला गवळी ,भालचंद्र हुच्चे,अतुल ढोकर  मंडळाच्या वतीने साडीचोळी, श्रीफळ, मंडळाच्या श्री ची प्रतिमा, सन्मान पत्र , शेला, शाल, टोपी इत्यादी देऊन निरोप देण्यात आला . मंडळाच्या वतीने या दांपत्याला दीर्घायुष्य , दीर्घ आरोग्य, सुख, समाधान लाभो अशी श्रीचरणी प्रार्थना करण्यात आली.


 
Top