धाराशिव (प्रतिनिधी)-रस्ता सुरक्षा सप्ताहा निमीत्त धाराशिव शहर वाहतुक पोलीस शाखा, एकता फाउंडेशन व गणेश मंडळ धाराशिव, सह्याद्री हॉस्पीटल धाराशिव, व नायगावकर क्लिनिक लॅब धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 05 मार्च 2024 रोजी धाराशिव वाहतुक पोलीस शाखेत मोफत नेत्र, शुगर तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात पोलीस अधिकारी, अंमलदार, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पोदार इग्लिंश स्कुल, सह्याद्री करिअर अकॅडमी, आर. पी. कॉलेज, आय.सी.आय.सी. फाउंडेशन धाराशिवचे शिक्षक व विद्यार्थी,  बॅक, स्टील असोशिएशन व रिक्षा चालकांनी सहभाग नोदंवला. 

याप्रसंगी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपस्थितांना वाहतुक कायदा व नियम विषयी मार्गदर्शन करून रॅलीस हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. त्यानंतर रॅली शहर वाहतुक शाखा गाडगे महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे फिरून वाहतुक पोलीस शाखा येथे रॅलीची सांगता झाली.

यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, धाराशिव शहर पोलीस ठोणेचे पोनि बाळासाहेब पवार, वाहतुक पोलीस शाखेचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्रसिंह ठाकुर, वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार, शहरातील मान्यवर डॉ. गोविंद कोकाटे, अमित कदम, शरद मुंढे, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, तसेच रिक्षा युनियनचे जल्लालभाई तांबोळी, चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मैनोद्दीन पठाण, फ्रेंन्डसग्रुप संस्थापक अध्यक्ष सत्तार कुरेशी, स्टील असोशिएशनचे अध्यक्ष अमर खडके, आय.सी.आय.सी. फाउंडेशनचे ऋषीकेश काटे, लोखंडे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पोदार इंग्लिश स्कुल, धाराशिव, सह्याद्री करिअर अकॅडमी, आर.पी. कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते.


 
Top