उमरगा (प्रतिनिधी)-येथील जिल्हयातील पहिले आय एस ओ मानांकित  उपक्रमशील जिल्हा परिषद हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाअभियानांतर्गत तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाले असून शाळेला तीन लाखांचेबक्षीस मिळाले आहे.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पद्माकर रावसाहेब मोरे यांच्या प्रयत्नातून शाळेत राबविले जाणारे वैशिष्ट्य पुर्ण उपक्रम 

धाराशिव जिल्ह्यातील पहिले टोबॅको फ्री हायस्कूल  शालेय परिसरात 30 गुंठे क्षेत्रावर 5000 वृक्षाची लागवड करून मियावाकी जंगल निर्मिती माजी विद्यार्थी व समाजातील दानशूर व्यक्तींकडून शाळेला 15 लाख रुपये रोख व वस्तू रूपाने लोक वाटा,25 अनाथ विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळण्यासाठी दत्तक योजना, विद्यार्थी वाढदिवस पुस्तक भेट योजनेतून शाळेय ग्रंथालयास 2500 पुस्तके शाळेला डिजिटल लायब्ररी 340 विद्यार्थ्यांना फायदागेल्या तीन वर्षांत 5 वी स्कालरशीप मध्ये शाळेचे 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारकांना 8 वी एन एम एम एस परिक्षेत प्रशालेतील 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक गेल्या पाच वर्षांत 10 वी चा निकाल दरवर्षी 94% घ्या पूढे  प्रतिक्षा प्रताप मोरे या विद्यार्थीनीची या वर्षी इनस्पायर अवार्ड साठी निवड नंतर 3 लाख रुपयांचे क्रीडा साहित्य 200 मीटर चे रिंग ट्रेक भव्य क्रीडांगण शाळेचे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेत राज्य स्तरावर यशस्वी बाल विज्ञान परिषद सतत दोन वर्षं प्रशालेचे विद्यार्थी नशनल लेवलवर गाईडच्या 17 मुलीना राज्य पुरस्कार,27 विद्यार्थी एलिमेटरी परीक्षा उत्तीर्ण निबंध स्पर्धा वादविवाद स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धेत शाळेचे जिल्हा स्तरावर यश स्काऊट गाईड अंतर्गत खरी कमाई शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून 51000 रूपये..सी सी टी व्ही कमेरे बसविले शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी 2 लाख 80 हजार रुपये खर्चून शालेय इमारतीला रंगरंगोटी  नवभारत साक्षरता अभियानांतर्गत शाळेचे उत्कृष्ट कार्य लोकसहभागातून शाळेय परिसर संरक्षण भिंत व शाळेच्या भिंतीवर लिखाण काम करून भिंती बोलक्या  शैक्षणिक सहल, विद्यार्थी बचत बँक, 60000 रुपये बचत.बाल संसदेतून विद्यार्थी व्यक्ती मत्व विकास, नेतृत्व गुण विकसित करणे, शाळेला सुंदर माझे कार्यालय पुरस्कार प्राप्त परिसरात घनकचरा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता मानिटर टप्पा 2 यशस्वी सहभाग 150 व्हीडिओ अपलोड शाळेचा ब्लॉग तयार करणे, सुसज्ज हन्डवाश स्टेशन, शालेय परसबाग, प्लास्टिक मुक्त व्यवस्थापन, नियमित जादा तास,100% उपस्थिती साठी उपस्थिती ध्वज उपक्रम, अमृत वाटिका ,मेरी माटी मेरा देश उपक्रमात सहभाग,सुसज्ज अटल लॅब, मिनी सायन्स लब, इंग्रजी लब,संगणक कक्ष, संपूर्ण शाळा डिजिटल..तीन इनटरक्टिव बोर्ड, तीन प्रोजेक्टर प्रत्येक वर्गात, विद्यार्थ्यांकडून वर्ग सजावट रिटेल व हेल्थ केअर या कौशल्य विकास विषयाच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी...शाळेतच विद्यार्थ्यांचे रक्त गट,बी पी तपासणी करण्याची सोय.व प्रत्येक महिन्याला तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन इ.उपक्रम राबवून शाळेने प्रगती केली आहे या यशासाठी शाळेतील शिक्षक विद्यानंद सुत्रावे बशीर शेख धनराज तेलंग बलभीम चव्हाण सरिता उपासे शिल्पा चंदनशिवे ममता गायकवाड सोनाली मुसळे संजय रुपाजी सदानंद कुंभार अमर घोडके फसद शेख नारायण अंकुशे सुनिता राठोड वनमाला वाले यांनी परिश्रम घेतले.या यशाबद्दल तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे युवा नेते किरण गायकवाड गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके केंद्रप्रमुख शिला मुदगडे शंकर सुरवसे सदानंद शिवदे पाटील, अशोक पतगे यांनी मुख्याध्यापक पद्माकर मोरे व सर्व टिमचे अभिनंदन केले.


 
Top