कळंब (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने डाँ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत केंद्र, तालुका,जिल्हा,विभाग व राज्य असे 5  स्तर ठेवण्यात आले होते. केंद्रस्तर वगळता प्रत्येक स्तरावर रोख बक्षिसे पण ठेवण्यात आली होती. यास्पर्धेत जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा या  शाळेने सहभाग घेऊन केंद्र,तालुका,जिल्हा,विभाग स्तरावरील मुल्यांकनात प्रथम क्रमांक घेऊन राज्यस्तरावर मुल्यांकनासाठी शाळा पात्र झाली होती.

यास्पर्धेसाठी विभाग व राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या  शाळेचा दि.5 मार्च रोजी टाटा थिएटर नरिमन पाँईंट मुंबई येथे मुख्यमंत्री ,एकनाथ शिंदे ,व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल,शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,  प्राथमिक शिक्षण संचालक  शरद गोसावी,शिक्षण संचालक बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील,शिक्षण उपसंचालक डाँ.गणपत मोरे , शिक्षक आमदार कपील पाटील,विक्रम काळे शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व बक्षिसाचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. जिल्हापरिषद प्राथमिक शाळेला लातूर विभागातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल  मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

हा सन्मान शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे ,गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी,  दत्तप्रसाद जंगम शाळेतील शिक्षक सचिन तामाने,अमोल बाभळे,श्रीकांत तांबारे ,शहाजी बनसोडे, राजाभाऊ शिंदे,लिंबराज सुरवसे, संजय झिरमिरे,प्रमोदिनी होळे, चित्रकार पंडीत वाघमारे यांनी स्विकारला.

शाळेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ.मैनाक घोष,शिक्षणाधिकारी अशोक पाटील,  गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाँ.दयानंद जटणूरे ,उपशिक्षणाधिकारी शिवाजी फाटक,शिक्षणविस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम यांनी अभिनंदन केले.


 
Top