धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर येथे राष्ट्रीय सेवा योजना व जल व भूमी व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी जल व भूमी व्यवस्थापनशास्त्र विभाग येथे काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयोजित कार्यक्रमाला डॉ. एन. पी. पाटील (विभागप्रमुख, जल व भूमी व्यवस्थापनशास्त्र विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर डॉ. आर. एम. खोब्रागडे (सुक्ष्मजीवशास्त्र विभाग) हे अध्यक्षस्थानी होते. डॉ. एम. के. पाटील (रसायनशास्त्र विभाग) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील पार्श्वभूमी विषद केली, तसेच दुष्काळाच्या झळा सर्वांनाच बसतात व आपण सर्वांनी पाणी जपून वापरायला हवे असे मत व्यक्त केले. आपल्या व्याख्यानामध्ये डॉ. एन. पी. पाटील यांनी जागतिक जल दिनाची पार्श्वभूमी विषद केली. 21 जुन रोजी दिवस आणि रात्र सारखे असतात व 22 जुन पासून दिवस हा मोठा होत जातो आणि खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची दाहकत निदर्शनात येते. आपण सर्वांनी वातावरणामधे होणारे बदल रोकण्यासाठी सहभाग नोंदविला पाहिजे, वृक्षारोपण तसेच जलसंवर्धन केले पाहिजे असे विचार डॉ. एन. पी. पाटील यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय सामारोपामध्ये डॉ. आर. एम. खोब्रागडे यांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी जल संवर्धन करणे हि काळाची गरज आहे. असे विचार व्यक्त केले. डॉ. जे. एस. शिंदे (शिक्षणशास्त्र विभाग) यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी योगिनी गुंजीटे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विभागातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच, जल जागृती सप्ताह नीमित्त “जल हेच जीवन” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.


 
Top