तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला केंद्राच्या प्रसाद योजनेत स्थान मिळावे यासाठी खासदार महोदयांनी साथी शिफारसही केलेली नाही. वोलघेवड्या खासदारामुळेच तुलजाभवानीचे तीर्थक्षेत्र केंद्राच्या प्रसाद योजनेपासून वंचित राहिले होते. परिणामी तुळजपुरच्या पर्यटन वाढीलाही निष्क्रिय खासदारामुळे खीळ बसली होती. तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मागील पाच वर्षात खासदारांनी काय केले याचे उत्तर त्यांनी द्यावे अन्यथा स्वतःचा निष्क्रियपणा मान्य करावा.

प्रसाद योजनेत राज्य सरकारला एक छदामही द्यावा लागत नाही. पूर्ण निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त तसा प्रस्ताव पाठवणे अपेक्षित होते. पोकळ भाषणबाजी करण्यात पटाईत असलेल्या धाराशिवच्या खासदारांचे नेते उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री तर त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे राज्याचे पर्यटन मंत्री होते. अडीच वर्ष सत्ता हातात असताना कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी यांना साधा प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे पाठवता आला नाही. ठाकरे पिता-पुत्रांच्या खास मर्जीत असलेल्या खासदारांनी यासाठी काय पाठपुरावा केला? फोनवरून सतत अडचणी सोडावीत असल्याच्या डिम्म्या मारणान्या खासदारांनी या कामासाठी स्वतःच्या नेत्यांना कथी फोन केला का? स्वतःचा निष्क्रियपणा लपविण्यासाठी गावगप्पा मारणाऱ्याने जगदंबेच्या आणि जगदंबेच्या भाविकांच्या सुविधांसाठी काय केले याचे उत्तर अगोदर द्यावे.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यासाठी तेंव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे लेखी मागणी केली होती. भाषणात उठसुठ आई तुळजाभवानीचे नांव घेत राजकारण करणाऱ्या खासदारांच्या नेत्यांनी त्याकडेही साफ दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना याबाबत पाठपुरावा केला, तुलजाभवानीच्या सेवेसाठी मागणी लावून धरली ठाकरे सरकारने त्याला देखील प्रतिसाद दिला नाही. तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या ठाकरे पिता-पुत्रांना जाब विचारण्याची धमक तुमच्यात आहे का? जून 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर तातडीने राज्य सरकारने केंद्राकडे रीतसर प्रस्ताव पाठवला. केंद्रानेही लगेच आई तुळजाभवानी देवीच्या सेवेसाठी तुळजापूरचा प्रसाद योजनेत समावेश केला. सहज शक्य असणारी ही बाब खासदार म्हणून आपण का केली नाही. तुळजाभवानी देवीची सेवा करण्यासाठी ज्या खासदारकडे वेळ नाही तो जनतेच्या काय कामी येणार ? राज्यातील सर्वात निष्क्रिय खासदार म्हणून आपला गौरव का केला जाऊ नये? हिम्मत असेल तर बोलघेवड्या खासदारांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला वरील प्रश्नांची उत्तरे द्यावी. असे दि.22 मार्च रोजी आयोजि केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, शांताराम पेंदे, शिवाजी बोंदले, संतोष बोबडे यांनी बोलताना सांगितले.


 
Top