धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या गूळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम व मोळी पूजन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्ताने पार पडला होता.या गळीत हंगामातील पहिली पावडर काल रात्री कारखान्यातून बाहेर पडत असल्याचा मोठा आनंद आहे.चेअरमन अभिराम भैय्या पाटील व आदित्य भैय्या पाटील यांनी पहिल्या गुळ पावडर पोत्यांचे पूजन केले.आपल्या कारखान्यातील या पहिल्या उत्पादनाचा आनंदच वेगळा आहे.

युगांडा देशाच्या व्यापार सहकारमंत्री नतबाजी हेरियट व कोलंबियाचे व्यापार सल्लागार जी.मोहनराव आणि अजिंठा फार्मा लिमिटेड सल्लागार मधुसूदन अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ होऊन हा गळीत हंगाम पार पडला होता.काल या हंगामातील पहिली पावडर बाहेर पडली.

हातलाई शुगर्सच्या आणि युगांडा सरकार यांच्यासोबत झालेल्या निर्यातीच्या करारातून या क्षेत्राला फायदा होणार आहे.या शुगर्स कंपनीमुळे तरुणाईला रोजगार मिळाला असून शेतकऱ्यांच्या ऊसाला हक्काचा कारखानाही मिळाला आहे. त्यामुळेच, या पहिल्या पावडर पोत्याचा आनंद हा संपूर्ण पाटील कुटुंबासह परिसरातील शेतकऱ्यांनाही आहे.

युगांडाच्या सहकारमंत्री नतबा हेरियट यांनीही आपल्या भाषणातून हातलाई शुगरच्या माध्यमातून या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ तर होईलच, पण त्यासोबत रोजगारची संधी या भागातील तरुणांना उपलब्ध होईल , आमच्या देशाबरोबर झालेल्या निर्यातीमुळे या क्षेत्राला ऊर्जितवस्था प्राप्त होईल असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विचारांना आता खरी सुरुवात झाली आहे. 

हातलाई शुगरचे चेअरमन युवा उद्योजक अभिराम भैया पाटील यांनी यावेळी आनंद व्यक्त करत या उत्पादन प्रक्रिया आणि कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील बळीराजाचं जीवन सुखमय करण्याचा आमचा प्रयत्न  असल्याचे म्हटले. तसेच, गळीत हंगामातील मोळी पूजन ते पोतेपूजनपर्यंतच्या प्रक्रियेत साथ, सोबत देणाऱ्या आणि कष्ट घेणाऱ्या सर्वांचे आभारही मानले. याप्रसंगी शितल गायकवाड, मुंडे साहेब चीफ इंजिनियर, रीतापुरे साहेब चीफ केमिस्ट, राशिद खान, ऋषिकेश शिंदे, लोमटे साहेब, आबा शिरसाट, शोएब खान व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


 
Top