भूम (प्रतिनिधी)- राज्यात आसलेल्या ब्राम्हण समाजास सामुहिक हत्या करुन संपविण्याची भाषा करण्याऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूम तालुका ब्राम्हण संघटनेच्या वतीने दि 1 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती यु ट्युबच्या माध्यमातुन व इतर काही चायनलच्या माध्यातून अज्ञात व्यक्तीने ब्राम्हण समाजास सामुहिक हत्या करुन 3 मिनीटात संपवु अशी भाषा वापरली आहे. यामुळे समाजाचामध्ये भितीचे वातावरण आहे. संबंधित व्यक्तीने 5 पेक्षा जास्त लोक जमवून संपविण्याची धमकी दिल्याचे निवेदणात म्हटले आहे. तरी सदर घटनेचा तपास करुन भविष्यात असा प्रकार होवु नये यासाठी कडक अंमलबजावनी करत संबंधितांवर गुन्हा करावा अशी मागणी भूम तालुका ब्राम्हण संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुधिर देशमुख, शहराध्यक्ष संजय शाळु, प्रशांत देवडीकर, अमोल तुळशी, हेमंत देशमुख, श्रीराम मुळे, मुसांडे काका, वैभव देवडीकर बाळासाहेब बेलसरे, रत्नाकर आरगडे ,सचिन बारगजे, श्रीकृष्ण पाटील, सचिन वैद्य ,श्रीपाद देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.


 
Top