भूम (प्रतिनिधी)-तुम्ही मला साथ द्या मी आरक्षण मिळवून देतो. अशी साद मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना भूम मध्ये घातली. 

भूम येथील श्री चौंडेश्वरी सभागृहामध्ये दुपारी जरांगे पाटील यांची संवाद बैठक आयोजन करण्यात आली होती. याप्रसंगी मनोज जरांगे पाटील बोलत होते. पुढे म्हणाले की, शासनाने आम्हाला दहा टक्के आरक्षण देऊन न मागता दिले आहे. यांचे कारण काय त्यांचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. या आरक्षणामध्ये इंजीनियरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये आरक्षण लागू होत नाही. उद्या कोणी कोर्टात गेले तर या आरक्षणाला कोणी विचारत नाही. अशा पद्धतीचे हे आरक्षण आहे. या आरक्षणाचा लाभ 200 ते 250 लोकांना लाभ मिळणार आहे. हे आम्ही आरक्षण घेतोय, परंतु आमच्या संगे सोयऱ्यांचे काय असा शब्द वापरत आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत. आमच्या या लढाईला उत्तरोत्तर यश येत आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे वेगवेगळ्या प्रकारचे दडपशाही, दंडमशाहीचे वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु आपण यांना जुमानणार नाहीत असेही जरांगे पाटील म्हणाले.


 
Top