तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरासह परिसरात रंगपंचमी उत्सव  शनिवार दि.30 मार्च रोजी शहरासह तालुक्यात रंगाची उधळण करीत रंगपंचमी उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी श्रीतुळजाभवानी मातेस दही दुध पंचामृत अभिषेक झाल्यानंतर देवीस  वस्ञ घालुन अलंकार घालण्यात आले. नंतर  महंत वाकोजीबुवा, हमरोजी बुवा, पाळीचे भोपे पुजारी यांनी  मुर्तीवर  रंगाची उधळण करीत पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सोमनाथ माळी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले सह सेवेकरी पुजारी उपस्थितीत होते. श्रीतुळजाभवानी मातेस रंग लावल्यानंतर शहरात रंगपंचमी खेळण्यास आरंभ झाला. सांयकाळी पाचवाजे पर्यत रंग खेळला गेला. यंदाच्या रंगपंचमीवर दुष्काळाची सावट जाणवली. यंदा तीव्र पाणीटंचाई पार्श्वभूमीवर शहरात कोरडा रंग मोठ्या प्रमाणात खेळला गेला. बच्चे कंपनीने माञ पाण्याचा रंग खेळला. बच्चे कंपनी सकाळ पासुन पिचका-या घेवुन रंग खेळण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. तर महिलांनी आपआपल्या भागातील महिलांना रंग लावुन रंगपंचमी साजरी केली.


जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी उत्साहात साजरी

धाराशिव शहर व जिल्ह्यात होळी नंतर पाच दिवसाने रंगपंचमी साजरे होत असते. त्या प्रमाणे शनिवार दि. 30 मार्च रोजी सर्वत्र रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. बच्चे कंपनीने सकाळपासूनच रंगाची उधळण चालू केली होती. लहान, मोठे, युवक, युवतीने ही रंगोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला. विशेष म्हणजे आज विवाह तिथी असल्यामुळे अनेकांचा हिरमुडही झाला आहे. तर काहीजणांनी लग्न सोहळा पार पाडल्यानंतर रंगोत्सव साजरा केला.  
Top