तुळजापूर (प्रतिनिधी)-  शहर व तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून तापमानाचा पारा सातत्याने वाढतच झाला आहे. शुक्रवार दि. 29 मार्च रोजी  तुळजापूरचा पारा  41.4 अंशावर तपमान गेले होते. तर गेल्या आठ दिवसापासून तापमानाचा परा 36 च्या  अंशाच्या खाली उतरायला तयार नाही. वाढत्या तापमानाचे

चटके वाढले असून यामुळे देवीदर्शनार्थ येणाऱ्या भाविकांसह तुळजापूरकर पुरते हैराण झाले आहेत.

मार्च अखेर तुळजापूरचे तापमान 39 ओलडल्याने एप्रिल मध्ये हे  तापमानाने चाळीशी ओलांडण्याची शक्यता  आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात हा पारा जवळपास 40 ते 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच तापमानाचा पारा वाढत होता. दहा वाजल्यापासूनच

उन्हाचे चटके बसायला सुरुवात होती. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडणे बंद केले आहे. दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडायला सुरुवात झाली आहे. तर दिवसभर उकाडा असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे फॅन, एअर कंडीशनर, कुलर यांचा वापर वाढला आहे. असाह्य उकाड्या पासुन सुटका मिळण्यासाठी भाविक नागरिकांनी  थंड पेयाच्या दुकानावर  गर्दी  केल्याचे  दिसून येतआहे.

शुक्रवार सकाळी बारा  वाजेपर्यत तापमान 36होते नंतर 39अशापर्यत गेले त्यातच ढगाळ,वातावरण मुळे उकाड्यात वाढ झाली. हवामान खात्याने  शनिवार दि. 30रोजी 39 अंसेल्सियस रविवार 31 मार्च रोजी 38, सोमवार दि. 1 एप्रिल रोजी 39 अंशसेल्सियस, मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी 39 अंशसेल्सियस तर गुरुवार दि. 3 रोजी 40 अंशसेल्सियस वर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात  शेतीचे काम पहाटे, सांयकाळी केली जात आहे. वाढत्या तापमानाचा फटका बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. वाढत्या तापमानाचा फटका देवीदर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना बसत आहे.


 
Top