तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातुन दोन उमेदवारी अर्ज दखल करण्याचा निर्णय मंगळवार दि.12 मार्च रोजीसकल मराठा समाजाचा बैठकीत घेण्यात आला 

सकल मराठा समाजाची धाराशिव लोकसभा मतदारसंघ नियोजन बैठक मंगळवार दि. 12 मार्च रोजी घेण्यात आली. या बैठकीत तुळजापूर  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातुन दोन उमेदवार लोकसभेसाठी उभे करण्याचा निर्णय झाला. यासाठी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती विभाग निहाय बैठक घेण्याचे ठरले. या उमेदवारासाठी अनामत रक्कम गावातुन लोकवाट्यातुन भरण्याचा निर्णय यात घेण्यात आला. तसेच लोकसभा मतदार संघासाठी  प्रत्येक बुथ वाईज कमिटी स्थापन्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही प्राथमिक बैठक असुन यानंतर विधानसभेसाठी व्यापक बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत अनेक  गावच्या उमेदवारांची नावे सकल समाजाकडे देण्यात आली. या बैठकीत मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील पाठीशी खंबीरपणे राहण्याचे ठरले. या बैठकीस  सज्जनराव साळुंके, महेश गवळी, जिवनराजे इंगळे,  कुमार टोले, तेजस बोबडे, अर्जुन साळुंके, जीवनराज इंगळे, अजय साळुंखे, प्रशांत सोंजी, अण्णासाहेब क्षिरसागर, दत्ता सोमाजी,सत्यजीत साठे, हरिभाऊ मोरे सह तालुक्यातील शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थितीत होता.


 
Top