तुळजापूर (प्रतिनिधी)-हारणी मध्यम प्रकल्प (काटगांव) मधुन विनापरवाना काळी माती काढुन दैनंदीन  विक्री करणारे विरुध्द कार्यवाही करण्याची मागणी  बंडोपंत चव्हाण यांनी केली आहे.

या प्रकरणी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , तुळजापूर तालुक्यतील काटगांव शिवारामधील हारणी मध्यम प्रकल्पमध्ये पुढील प्रमाणे गावे दिडेगांव, काळेगांव, नांदूरी, चव्हाणवाडी येथे खुप मोठया प्रमाणात गाळ (काळी) माती काढुन विक्री केली जात आहे.  ज्या शेतकऱ्यांच्या  जमीन (शेती) तलावमध्ये गेलेली आहे. त्यांना फक्त त्याच्याच नावाने शेतामध्ये माती टाकण्यासाठी आपल्या कार्यालयात मार्फत परवानगी देण्यात आलेली आहेत. तरी हे शेतकरी आपल्या कार्यालयाकडुन परवानगी काढुन गावामधील व बाहेरगावी शेतकरी यांना गाळ (काळी मातीचे) 1500 रुपये दर एक हायवाचे पैसे घेवुन विक्री करीत आहेत. माती टाकणारे शेतकरी यांचे खुप प्रमाणात आर्थीक नुकसान करीत आहेत. ज्या शेतकरी यांची शेतजमीन हरणा मध्यम प्रकल्पामध्ये गेलेली आहे त्यांना आपल्या कार्यालयामधून त्यांच्या शेतामध्ये गाळ माती उपसा करणेसाठी परवानगी दिलेली जाते. ते शेतकरी ती परवानगी घेवुन दुसऱ्या शेतजमीन गट नं. मधील गाळ (माती) उपसतात व शासनाची दिशाभुल करतात.

या माती वाहतूकमुळे शेतरस्ते व डांबरी रस्त्याची वाट लागली आहे. येथे  10 टायर, 6 टायर हायवा 210 पोकलेन मशिन माध्यमातून उपसा चालु आहे. या अवैध काळ्या माती उपसा बाबतीत तिथे कार्यरत असलेले महसुल कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी या प्रकरणी दोषीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली जात आहे


 
Top