तुळजापूर (प्रतिनिधी)-  एसटी काँलनीतील खाजगी जागेतील  कचऱ्याचे तात्काळ निमुर्लन करण्याच्या सुचना स्वछता विभागाला नुतन मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांनी एसटी प्रभागाला भेट दिली असता दिल्या.

शहरातील वाढत्या नागरी समस्या,  तात्काळ जागेवर सोडता याव्यात या उद्देशाने मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतुन प्रभागनीहाय भेट देऊन जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नगरपरिषद आपल्या दारी हा उपक्रम  मंगळवार दि. 12 मार्च पासुन एसटी  कॉलनी  प्रभागातुन प्रारंभ  करण्यात आला. 

यावेळी या भागात खाजगी प्लाँटवर कचरा  मोठ्या प्रमाणात आढळून आला.  या बाबत स्वच्छता विभाग यांनी तात्काळ कचरा निर्मूलन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  कांहीं नागरिक यांनी जागेच्या तक्रारी मांडल्या.  त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले.  मोकळ्या जागा विकसित कराव्या अशी सूचना कांहीं स्थानिकांनी केली. यावर नगरपरिषद अभियंता यांना सूचना देवून सदर मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी अंदाज-पत्रक तयार करण्याच्याही सुचना दिल्या.  शिवाय पुजारी नगर भागातील नागरिकांनी रस्ता व नाली तात्काळ करुन घेणेची विनंती केली असता. प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे तेथील नागरीकांना सांगितले. दोन तासा पेक्षा अधिक काळ सर्व विभाग प्रमुख यांच्यासह फिरुन विविध तक्रारीच्या अनुषंगाने तेथील तक्रारी व अडीअडचणी समजून घेतल्या. मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानामुळे नागरिक खूप समाधानी असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी उपस्थित नागरिक यांचेशी बोलताना  उद्देशाने मुख्याधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर (भा.प्र.से.) यांनी सांगितले की, शहर विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. या भागातील नागरिकांनी लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा विकसित करण्यासाठी सुचवले असता यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. आपल्या आजूबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा.  सद्या पाणी टंचाई असल्याने पाण्याचा वापर जपून करावा. प्लास्टिक वापर करु नका. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करा. नगरपरिषदेचा कर वेळेवर भरा. इ.सूचना केल्या.


 
Top