धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदअंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील बाळासाहेब ठाकरे नगर, शाहू नगर, अष्टविनायक चौक ते सुलतानपुरा, शिरीन कॉलनी, गालिब नगर, रजा कॉलनी यांना जोडणारा मुख्य डीपी रोड तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा धाराशिव - कळंब विधानसभा मदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.11) करण्यात आला. या प्रभागात 2 कोटी 18 लाख रुपये खर्चाच्या एकूण पाच कामंना मंजुरी मिळालेली असून कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे.

शिवसेना शहर संघटक प्रशांत साळुंके यांनी प्रभाग क्रमांक चार मधील प्रलंबित विकास कामांना निधी मिळावा यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी विक्रम पाटील, पंकज पाटील, दिनेश बंडगर, मनोज पडवळ, भागवत गोरे बप्पा, अजित बाकले, युवराज राठोड, नाना सुरते,  भिसे गुरुजी, विलास सुरते, अविनाश चव्हाण, विजयकुमार सर्जे, दत्ता सोकांडे, साईराज कदम, विकास जाधव, राजाभाऊ ढवळे, गोपीनाथ चव्हाण, अनिकेत कोळगे, संदेश जाधव, अजित बाकले, अजित शिंदे, पिंटू डावखरे, सचिन सर्जे,  कांबळे, बनसोडे, चव्हाण, बंटी जगताप यांच्यासह प्रभागातील विविध मान्यवर नागरिक, महिला उपस्थित होत्या.


 
Top