तुळजापूर (प्रतिनिधी)- ग्रामस्थांनी ग्रामसभेत संम्मती दिल्यावरच पवनचक्की चालु करावी. अन्यथाः तेथील पवनचक्कीचे पाते फिरणार नाही. याची दक्षता घ्यावी . तसेच उपरोक्त सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून, जिल्हयातील कोणत्याही बड्या सत्ताधारी अथवा विरोधक लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी न पडता, तातडीने तुळजापूर तालुक्यातील उर्वरीत पवनचक्क्यांचे काम बंद करण्याबाबत आदेश काढून तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या पवनचक्की कंपन्या, त्यांचे सर्व अधिकारी, स्थानिक दलाल, लाखो रुपयांची लाच घेणारे कांही लोकप्रतिनिधी व गावपुढारी यांची सी आय डी चौकशी करून यांच्या मुसक्या आवळाव्यात व तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीला भविष्यातील रुक्ष वाळवंट होण्यापासून वाचवावे अशी मागणीही प्रशांत नवगिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.


 
Top