तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील टेलरनगर शिवारात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असुन शेतकऱ्यांच्या शेतातील अवजारे साहित्य चोरी करीत असल्याने या भुरट्या चोरांना  शेतकरी वैतागले असुन या भुरट्या चोरांचा बंदोबस्त पोलिसांनी करण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. दुष्काळाचे संकट झेलत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पाणबुड्या मोटारी सह शेत अवजारे चोरटे चोरून नेत आहेत. तसेच बोअर मधील मोटारी काढुन चोरटे चोरून नेत आहेत. तसेच रोडवरील छोटी दुकाने ही चोरटे फोडत आहेत. शेतकऱ्यांनी राञी शेत राखावे तर चोरट्यांकडुन मारहाणची भिती, न थांबावे तर शेतअवजारे चोरीची भीती काय करावे, या संकटात शेतकरी सापडला आहे. पोलिसात तक्रार करण्यास गेले कि संशियताचे नाव सांगा अशी सक्ती करित आहेत. एकदंरीत पोलिसांची असावी लागणारी भीती या भागात राहिली नसल्याचे दिसुन येत आहे. तर दुष्काळाशी दोन हात करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील चोऱ्या रोखण्यासाठी भुरट्या चोरट्यां पकडुन गजाआड करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 


 
Top