तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील  रेशन दुकानांवर  गोरगरीबांना अन्नधान्यांसोबत आता साडीही वाटप सुरु केले असताना साड्यावर असणाऱ्या नेत्यांचा फोटो मुळे आचारसंहिता लागू होताच साड्या वितरण थांबविण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या आदेशा नंतरच लाभार्थींना साड्या वाटप सुरु करण्यात येणार असल्याची माहीती सुञाने दिली.

तुळजापूर  तालुक्यात अंत्योदय रेशनकार्डचे 4781 लाभार्थी असुन तेवढ्या साड्या पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या व त्याचे वाटप सुरु होते. आजपर्यत 2082 लाभार्थांना अंत्योदय योजनेतुन साड्या वाटप  करण्यात आले. माञ शनिवार दुपारी साडेतीन नंतर आचार संहिता लागु होताच अंत्योदय रेशन कार्डधारकांना साड्या वाटप थांबविण्यात आले. यामागे अंत्योदय साड्यांवर नेत्यांचे फोटो असल्याने यामुळे आर्दश आचार संहितेचा भंग होण्याची शक्यता गृहीत धरुन तहसिलच्या पुरवठा विभागाने साड्या वाटप थांबवले आहे. या साड्या वाटप बाबतीत निवडणूक आयोग काय भूमीका घेते यावरच अंत्योदय साड्या वितरण भवितव्य अवलंबून आहे. यामुळे आचारसंहिते नंतर साड्या वितरणाची मोठी शक्यता आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना  मोफत देण्यात येणारी ही साडी दर्जा बाबतीत अंत्योदय कार्डधारकात नाराजी वर्तवली जात आहे.  सरकारच्या वतीने गोर-गरीब शिधा पत्रिकाधारकांना सध्या मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. राज्यांतील गोर, गरीब नागरीकांना

स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी राज्य सरकारने अन्न पुरवठा योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर आता अंत्योदय शिधा पत्रिकाधारकांना अंत्योदय मोफत धण्याबरोबरच वर्षांतुन एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडुन अन्नधान्या सोबत मोफत साडीही मिळणार असल्याने गोरगरीबांना दुष्काळात ही दीलासा देणारी बाब होती. माञ ऐन निवडणुक तोंडावर वितरण केल्याने यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. सदरील साडी पॉलिस्टरची आहे.


 
Top