धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले.  दि.11.03.2024 रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकास बालाजीनगर शेकापूर रोड, धाराशिव येथे अनैतिक देह व्यापार चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून आरोपीस अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस पथक हे गस्तीस असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, धारशिव शहरातील बालाजीनगर येथे एक महिला काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने नमुद ठिकाणी छापा टाकला असता बालाजीनगर मधील एका घरामध्ये तीन महिला आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली. आरोपी भाग्यश्री नारायण इंगळे, वय 40 वर्षे, रा. बालाजीनगर शेकापुर रोड धाराशिव या महिलेस वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यास लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होती. धारशिव शहर पोलीस ठाण्यात दि. 11.03.2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, मपोहेकॉ शोभा बांगर, चालक पोहेकॉ लाटे यांच्या पथकाने केली.


 
Top