भूम (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी जनता एकजूट झाली असल्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये चालु खासदार ओमराजे निंबाळकर यांचे साधे आणि सरळ नेतृत्व मानून जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. त्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. शिवसेनेच्या नेत्याबद्दल आर्वाश्च भाषा वापरल्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेसह आंदोलन करून फलक झळकवले आणि उपविभागीय आधिकारी यांना निवेदन दिले.

दि. 11 मार्च रोजी भूम येथे मुख्य गोलाई चौकामध्ये आदोलन केले आहे. शिवसेना पक्षाला सहनभूती मिळत असुन बिगर पैसे खर्च करता जनता उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखोच्या हाजारोच्या संख्येने सर्वसामान्या जानता माता भगीनी पाठीशी उभा राहत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे सर्व सामान्य नागरिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहीला आहे. भूम-परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या गंभीर आजाराबद्दल पालकमंत्र्यांनी जी टिका केली त्याबद्दल सर्वसामान्य लोकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी भूम तालुका प्रमुख अड. श्रीनिवास जाधवर महिला आघाडी जिल्हा प्रमुख जिनत सय्यद, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर चेतन बोराडे, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, विधानसभा समन्वयक दिलिप शाळू, युवा सेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे, महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा रणदिवे, ताई लांडे, अनंद नलावडे, रामभाऊ नाईकवाडी, दिपक मुळे, शोक वनवे, श्रीमंत भडके, विहंग कदम, ॲड. विनायक नाईकवाडी, अनिल शेंडगे, मनोज पेंटर, युवासेना संघटक आजित तांबे, सुवर्णा लोंढे, वंदना आडागळे, विकास चव्हाण, शंकर गपाट, संग्राम लोखंडे यांच्या सह शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.


 
Top