धाराशिव (पतिनिधी)- संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करुन शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षीत बेरोजगारांचे सर्व कर्ज माफ करावे, यासह इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी (दि.13) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी आक्रोश व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

खरीप 2023 मधील शेतकऱ्याचे नगदी पीक सोयाबीन कमी पावसामुळे हातचे निघून गेले. 2023 मधील रब्बी हंगामातील हरभरा पीकाला एकरी एक क्विंटल उतार मिळाला, शेतीला पाणी नाही, विहीरीनी तळ गाठला आहे. शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षीत बेकार युवक भयग्रस्त झालेला आहे. जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील अडीअडचणी विषयी वेळोवेळी लेखी निवेदन देवूनही आजतागायत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्या निषेधार्थ सामान्यांचा जनआक्रोष व्यक्त करण्यात आला. 

संपूर्ण जिल्हा तीव्र दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी अनुदानाचे वाटप ताबडतोब करावे. शेतकरी, शेतमजूर व सुशेक्षति बेरोजगाराचे संपूर्ण कर्ज माफ करावे. गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये लिटर प्रमाणे भाव देवून सरकारने घोषीत केलेले प्रती लिटर 5 रुपयचे अनुदान त्वरीत वाटप करावे. सन 2022 चा शिल्लक पीक विमा रक्कम त्वरीत वाटप करावी, सन 2023-2024 मधील पीक विमा आग्रीम रक्कम सर्व शेतकऱ्यांना त्वरीत वाटप करावी, सन 2023 चा संपूर्ण पीक विमा मिळावा अन्यथा पीक विमा कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करावे. यावेळी जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर, संजय पाटील दुधगावकर, भास्कर शिंदे, भालचंद्र बिराजदार, नरदेव कदम, सुरेश टेकाळे, मुसद्दीक काझी, रमेश देशमुख, नसीर शहाबर्फीवाले, श्रीहरी नाईकवाडी, बालाजी डोंगे, मुस्ताक हुसेनी, शिवाजी सावंत, विठ्ठल माने, मनोहर हारकर, अभिजित लोभे, शामसुंदर पाटील, अमर चोपदार, राजेंद्र लोमटे, औदुंबर धोंगडे, बाळासाहेब कथले, सागर चिंचकर, ॲड. प्रविण शिंदे, किशोर आवाड, ॲड. श्रीपाद तावरे, नारायण चोंदे, नानासाहेब जमदाडे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top