उमरगा (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवारा पुणे तर्फे 'सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा 2024' तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (ता. 3) रोजी युनिटी हॉस्पिटल, औंध येथे करण्यात आले होते. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सेवा रत्न गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. सन्मानित करण्यात आलेल्या ॲड.फरहीन खान-पटेल या व्यवसायाने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उमरगा येथे वकील आहेत.

मिसेस युनायटेड सौ.भवानी राकेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, उद्योजिका सुप्रिया बडवे, सौ.सुनीता राजे पवार (संस्कृती प्रकाशन पुणे), राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, शांतीदूत परिवाराच्या संस्थापिका सौ. विद्याताई जाधव, राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव, युनीटी हॉस्पिटलच्या डॉ. प्रिती काळे, डॉ. अमित काळे,  उद्योजक हर्षल गौंड पाटील, माजी मुख्य अभियंता प्रल्हाद साळुंखे, डॉ. वेंकट साई, अभिनेत्री रोहिणी कोलेकर, सुरेश सकपाळ, विजया नागटिलक, मधुकर चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृषाली जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन हभप. विजय बोत्रे तर आभार मोनिका भोजकर यांनी मानले. 
Top