भूम (प्रतिनिधी)-देशात हुकूमशाही चालु असुन लोकशाही टिकवायची असेल तर येणाऱ्या निवडणूकीमध्ये महागाई, हुकूमशाही मोडीत काढायची असेल तर मशाल चिन्हा समोरील बटन दाबून मला निवडून देऊन पुन्हा आपली सेवा करण्यासाठी साठी संधी द्यावी असे आवाहन खासदार ओम राजेनिंबाळकर  यांनी केले आहे.

लोकसभेची निवडणूकीची सुरवात झाली असुन मला महाविकास आघाडीची उमेदवारी घोषीत करण्यात आली असुन मी आज पर्यंत आपल्या भागाचा खासदार म्हणून सेवा करत आहे केली आहे कोणी काही पैशाच्या जोरावर हुकूमशाही च्या मार्गाने वाचाळ भाषा बोलत आहेत आपणावर आपल्या आईबापा चे संस्कार चांगले आहेत त्यामुळे आपण चांगलेच वागायचे आणि चांगलेच बोलायचे असे निंबाळकर म्हणाले धाराशिव लोकसभा निवडणूकि च्या अनुषंगाने भूम तालुक्या मध्ये गाव भेटी दौरा करण्यात आला असून निवाणी, लाजेश्वर, घाटनांदूर, जेजला, नळी, वडगांव ज्योतीबाची वाडी, गणेगाव, आंतरगांव वांगी या गावासह इतर गावामध्ये गावभेटी दौरा करून नागरिकां बरोबर संवाद साधला असून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख रणजित पाटील उपजिल्हाप्रमुख डॉ चेतन बोराडे, भूम तालुका प्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, विधानसभा समन्वयक दिलिप शाळू , आनिल शेंडगे, युवासेना सरचिटणीस माऊली शाळू, प्रतिक रणदिवे, राजाभाऊ नलावडे, उपतालुका प्रमूख रामभाऊ नाईकवाडी, आविनाश गटकळ, दिपक मुळे, अनंद दोरगे, अशोक वनवे, श्रीमंत डोके, श्रीमंत भडके,  विहंग कदम, ॲड. विनायक नाईकवाडी, लक्षमण  गोलेकर, संग्राम लोखंडे, बुद्धीवान लटके यांच्या सह शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.


 
Top