धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव नगर परिषदअंतर्गत विविध योजनांमधून शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास  पाटील, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, जनता बँकेचे माजी चेअरमन विश्वास  शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील महात्मा गांधीनगर येथे 15 लाख रुपये खर्चाचे राजमाता जिजाऊ उद्यान आणि वाचनकट्टा याचे लोकार्पण, छत्रपती संभाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता (73.93 लाख), विसर्जन विहीर ते सुधीर पाटील यांच्या घरापर्यंत हॉटमिक्स रस्ता (67.91 लाख), प्रभात पतपेढी ते पुष्पक मंगल कार्यालय पर्यंत हॉटमिक्स रस्ता (28 लाख), या कामांचे उदघाटन तसेच भीमनगर भागात 2 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उदघाटनही करण्यात आले. यामध्ये त्रिशरण चौक ते सिव्हील चौकापर्यंत हॉटमिक्स रस्ता, गांधी मेडिकल ते सिद्धार्थ बनसोडे यांचे घर हॉटमिक्स रस्ता, पोलाद चौक ते लहुजी चौक हॉटमिक्स रस्ता, लहुजी चौक ते वैराग नाका (फकिरा नगर) हॉटमिक्स रस्ता, प्रभाग  14 अंतर्गत भीम नगरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ते कसबे घर सिमेंट रस्ता व नालीकाम, पेव्हर ब्लॉक या कामांचा समावेश आहे.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, गटनेते सोमनाथ गुरव, बाजार समिती संचालक उमेश राजेनिंबाळकर, बबलू शेख, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, प्रदीप घोणे, राणा बनसोडे, खलिफा कुरेशी, महेबूब पटेल, प्रशांत वाघ, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, अनिल नाईकवाडी, अब्दुल लतीफ, सिद्धार्थ बनसोडे, मैनूद्दिन पठाण, नवज्योत शिंगाडे, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top