कळंब (प्रतिनिधी)-  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि छ्त्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब, शरदचंद्र महाविद्यालय, शिराढोण संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या संकल्पनेनुसार शैक्षणिक वर्ष (2024-25) पासून महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या धोरणावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यासाठी  मार्गदर्शक  प्रा.डॉ डी.एन. मोरे (पीपल्स कॉलेज, नांदेड) म्हणून लाभले. यावेळी प्रा.डॉ डी.एन.मोरे यांनी सातत्याने नवीन काळाची पावले ओळखून आपण येणाऱ्या बदलाना सामोरे गेले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी केंद्रित बदल, ऑनलाईन आणि ऑफलाईन, अभ्यासक्रम संरचना, विषय निवड, मेजर- मायनर विषय, मुद्दे, क्रेडिटस, सत्र पद्धती, कौशल्य विकास कार्यक्रम अशा विविध प्रकारच्या बाबींची माहिती दिली आणि शेवटी उपस्थितांचे प्रश्नोत्तरे घेण्यात आली.

 व्यासपीठावर समन्वयक प्राचार्य डॉ.सुनिल पवार, उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे, डॉ.हेमंत भगवान, डॉ.साजिद चाऊस उपस्थित होते. कार्यशाळेचे  सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. ए.आर.मुखेडकर तर सहसमनन्वक डॉ.के.डी.जाधव यांनी आभार मानले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी केले.

यावेळी डॉ.नामानंद साठे, प्रा.नितीन अंकुशराव, डॉ. ईश्वर राठोड, डॉ. एन.एम.अदाटे, प्रा.एम.एन.साखळकर, प्रा.संदिप महाजन, प्रा.व्ही.टी.सरवदे, प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव, प्रा. डॉ.के. डबलू.पावडे, डॉ.आर.व्ही.ताटीपामूल, डॉ.डी.एन.चिंते, डॉ.विश्वजित मस्के, प्रा.डॉ.हेमंत चांदोरे, प्रा.शाहरुख शेख यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी डॉ. अमरसिंह वरपे, डॉ. भोसले यांनी  तांत्रिक  सहकार्य केले. तिन्ही महाविद्यालयातील 61 प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. 


 
Top